
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बियाणे प्रक्षेत्रावरील कांदा (फुले समर्थ) बिजोत्पादन गुणवत्तापूर्ण व दर्जेदार*- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के
राहुरी विद्यापीठ, दि. 20 मार्च, 2025 विद्यापीठाने संशोधीत केलेल्या कांदा पिकाच्या विविध वाणांना शेतकर्यांची पहिली पसंती असते. पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी बियाणे दर्जेदार असणे अत्यंत महत्वाचे आहे. विद्यापीठ नेहमीच चांगल्या प्रतिचे बियाणे उत्पादन करत असून बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावरील कांदा पिकाचे (फुले समर्थ) बिजोत्पादन गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.
महाराष्ट्रातील शेतकर्यांना खरीप हंगामात कांदा (फुले समर्थ) बियाणे मुबलक प्रमाणात मिळावे म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या नेतृत्वाखाली तसेच कुलसचिव तथा बियाणे विभागाचे प्रमुख डॉ. नितीन दानवले यांच्या नियोजनातून बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात कांदा (फुले समर्थ) पिकाचे बीजोत्पादन घेण्यात आले आहे. बियाणे विभागाच्या ब, क, ड व फ विभागाच्या प्रक्षेत्रावर या बीजोत्पादन पिकाची पाहणी विद्यापीठातील अधिकार्यांनी केली. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेश दोडके व बियाणे प्रक्षेत्र अधीक्षक प्रा. बी.टी. शेटे तसेच बियाणे विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.