सातारा : टेंभू प्रकल्पात बुडालेल्या युवतीचा मृतदेह मिळाला
कराड : रंगपंचमी खेळण्यासाठी टेंभू तालुका कराड येथील टेंभू प्रकल्प परिसरात गेलेल्या एका युवतीचा प्रकल्पाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास टेंभू प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक एक ब जवळ ही दुर्दैवी घटना घडली होती. पोलिसांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित युवतीचा मृतदेह मिळाला. जुही घोरपडे (रा. कराड) असे बुडालेल्या युवतीचे नाव आहे.