जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, केडगाव, अहिल्यानगर व यशवंत सेना, अहिल्यानगर सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय "आदर्श पत्रकारीता" पुरस्कार प्रमोद डफळ यांना जाहीर
अहिल्यानगर : दि. २० मार्च २०२५, जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रमोद डफळ यांना जाहीर करण्यात आला ते आजतागायत मराठी माणसाच्या बुलंद आवाजासाठीच लढत असुन पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्राची व्याख्या बदलून टाकली आहे. त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत "जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था" केडगाव, अहिल्यानगर व यशवंत सेना अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. कांतीलाल जाडकर यांनी आदर्श पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दलचे निवडपत्र दि. १७ मार्च रोजी त्यांना पाठवले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की आपण गेली कित्येक वर्ष समाज निर्मितीसाठी घट्ट पावले होऊन एक चांगले पुण्याचे काम करीत आहात, तसेच संविधानातील मूल्यांची जोपासना जनमानसात विविध उपक्रम व कार्यांद्वारे यशस्वी करीत आहात. प्राप्त परिस्थितीचे योग्य आकलन करून तात्कालीन समस्यांना भिडून आपल्या परीने या प्रक्रियेला जास्तीत जास्त गतिमान करून आपले विचार पुढे नेणारे असतात. तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, केडगाव अहिल्यानगर व यशवंत सेना अहिल्यानगर यांच्या वतीने आपल्याला राज्यस्तरीय "आदर्श पत्रकारिता" हा पुरस्कार जाहीर केला असुन सदर पुरस्कार रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्वस्तिक चौक, अहिल्यानगर येथे सकाळी ११ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते आपल्याला बहाल करण्यात येणार आहे. असे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष श्री. कांतीलाल जाडकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.