logo

PM Kisan APK file तुम्हालाही व्हॉट्सअपवर असा मेसेज आलाय का? मग ही बातमी नक्की वाचा पीएम-किसान योजनेच्या अनुषंगाने फसवणूक टाळण्यासाठी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड न करण्याचे आवाहन

दैनिक मावळ न्यूज : पंतप्रधान किसान सन्मान निधी

(पीएम-किसान) योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होते, अशी माहिती मिळाली असून शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता : 'पंचजन्य ऑटोमोबाईल', तळेगाव दाभाडे / RSM@PANCHJANYA.CO.IN

अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ आणि अॅपचाच वापर करावा. कोणतीही अज्ञात APK फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नये. संशयास्पद लिंक आणि संदेशापासून सावध रहावे.
कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेला पीएम- किसान संबंधित लिंक असलेला संदेश उघडू नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर बँक खाते किंवा आधार क्रमांक सांगू नये. फसवणूक झाल्यास सायबर गुन्हे तक्रार संकेतस्थळ https://cybercrime.gov.in वर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

14
2578 views