logo

पाचोरा येथे "चला उद्योजक होवू या ,तरुण बेरोजगारांना सुवर्ण संधी"....!

पाचोरा येथे "चला उद्योजक होवू या ,तरुण बेरोजगारांना सुवर्ण संधी" कार्यशाळा संपन्न झाली

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),सर्व राष्ट्रीयकृत बँका,Agrarian consultancy services jalgaon यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना (पीएमएफएमई) योजनांतर्गत उद्योजकता निर्माण करणे एकदिवसीय कार्यशाळा- '' किसान गप्पा गोष्टी च्या माध्यमातुन उद्योगाच्या दिशेने " चला उद्योजक होवू या कार्यशाळा संपन्न''

दि. १९ मार्च २०२५ रोजी पाचोरा
तालुक्यातील शासकीय फळरोप वाटीका, तालुका कृषि अधिकारी पाचोरा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),सर्व राष्ट्रीयकृत बँका,Agrarian consultancy services jalgaon यांच्या संयुक्त विद्यमाने '' किसान गप्पा गोष्टी कार्यक्रमांतर्गत " चला उद्योजक होवू या कार्यशाळा संपन्न'' झाली.
सदर कार्यशाळेसाठी श्री युवराज चौधरी चिफ मॅनेजर क्रेडीट ॲन्ड एन.पी.ए स्टेट बँक ऑफ ईंडीया, श्री मंगेश मिसाळ ॲग्रीकल्चर ऑफीसर आर.एम.ऑफीस जळगांव, तालुका कृषि अधिकारी पाचोरा श्री रमेश जाधव ,श्री समाधन पाटील जिल्हा संसाधन व्यक्ती जळगांव (पीएमएफएमई) योजना,श्री आशीष काबरा जिल्हा संसाधन व्यक्ती जळगांव (पीएमएफएमई) योजना तसेच यशस्वी उद्योजीका उज्वला दत्तात्रय पाटील,अंजली अनिल चव्हाण यांच्यासह तालुक्यातील ईच्छुक उद्योजक शेतकरी उपस्थीत होते.
कार्यक्रमास उपस्थीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सर्वप्रथम श्री समाधान पाटील यांनी पंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योयन योजनेतुन उभारण्यात येणाऱ्या उद्योगांची सखोल माहीती उपस्थीतांना करुन दिली व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेसाठी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेचे मापदंड या बाबत मार्गदर्शन केले.तदनंतर युवराज चौधरी चिफ मॅनेजर क्रेडीट ॲन्ड एन.पी.ए स्टेट बँक ऑफ ईंडीया, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेतील कर्ज प्रकरणातील अडचणी व उपाययोजना या बाबत मार्गदर्शन केले. तदनंतर श्री मंगेश मिसाळ ॲग्रीकल्चर ऑफीसर आर.एम.ऑफीस जळगांव यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेत कृषी विभागाचा सहभाग याबाबतीत मार्गदर्शन केले,त्यानंतर श्री रमेश जाधव तालुका कृषि अधिकारी,पाचोरा यांनी आपल्या अध्यक्ष स्थानावरुन (पीएमएफएमई) योजनेअंतर्गत काढणीपश्च्यात तंत्रज्ञान या विषयी सविस्तर मार्गदर्शनसह उद्योगाची अचुक निवड तो स्थापन करण्याची सविस्तर प्रक्रीया यांवर मार्गदर्शन करत समुह आधारीत साखळी पघ्दतीने विपणन व्यवस्था कशी निर्माण करावी या बाबतीत आदर्श बाजार व्यवस्थेचे मॉडेल विषद केले व यातुन शेतमाल उत्पादनांचे विपनासाठी " शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेली बाजार व्यवस्था,म्हणजेच आदर्श बाजार व्यवस्थेचे" प्रारुप समजावुन सांगीतले.तदनंतर यशस्वी उद्योजीका श्रीमती उज्वला दत्तात्रय पाटील व श्रीमती अंजली चव्हाण यांनी त्यांचे अनुभव,आलेल्या अडचणी कथन केले.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तालुक्यातील ३५० नवोउद्योजकांनी सहभाग नोंदविलेला होता,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री उमेश पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ कृषि अधिकारी एस.पी.बोरसे,यु.आर.जाधव,एस.ए. पाटील,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव व कृषि विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

0
0 views