logo

आज पिंपळगाव सराई संदल घरातून निघणार सैलानी बाबाचा संदल

आज पिंपळगाव सराई संदल घरातून निघणार सैलानी बाबाचा संदल

aima media••••••• सादिक शाह•9145298519
रायपुर दि. १९

जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सैलानी बाबाच्या यात्रेला होळी पासून सुरुवात झालेली आहे. आज १९ मार्च रोजी पिंपळगाव सराई येथून रात्री ८ वाजता शेख रफिक मुजावर, शेख हाशम मुजावर, जहीर मुजावर, यांच्या संदल घरातून सैलानी बाबाचा संदल निघणार असून रात्रीच पादीच्या रस्त्याने डोंगर पहाडातून सैलानी बाबाचा संदल सैलानी दर्गावर पोहोचणार आहे.

या संदलासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून परभणी, बीड, जिंतूर, हैदराबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पुसद, जालना, हिंगोली, कळमनुरी, अनेक भागातून भाविक सनदलाच्या दर्शनासाठी दाखल

झालेले आहे. तसेच प्रशासन सुद्धा संदलच्या नियोजनासाठी सज्ज झाले आहे. या संदल बंदोबस्त साठी अमरावती विभागातून २५० पोलीस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी ३१ अधिकारी, दोन दंगाकाबुपथक, याबरोबरच बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे पोलीस उपाधीक्षक बीबी महामुनी तसेच डी वाय एस पी सुधीर पाटील बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे रायपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार दुर्गे श राजपूत संदल साठी उपस्थित

राहणार आहे. सैलानी बाबाच्या संदलाचे भाविकांनी शांततेने दर्शन घ्यावे संदल नेणाऱ्या उंटनीवर नारळ फेकू नये. जेणेकरून सैलानी बाबाची संदल उंटनी जखमी होणार नाही तसेच पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी होणार नाही याची भाविकांनी दक्षता घ्यावी. संदल संपल्यानंतर भाविकांनी यात्रेतून वाहने सुरक्षित काढून सुरक्षित चालवावे असे आवाहन यात्रा प्रमुख कर्तव्य दक्ष ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी आवाहन केले आहे.

77
3969 views