
मोठेगाव येथे शिवारात विहिरीचे खोदकाम करताना दोघांचा मृत्यू
रिसोड तालुक्यातील मोठेगांव शेतशिवारात विहीरीचे खोदकामात दोघांचा दबुन मृत्यु
रिसोड : विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक विहीर खचुन यामध्ये दबुन दोघा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 मार्च रोजी दुपारी तीन वाजता रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे घडली. घटनेची माहिती समजतात परिसरातील नागरिकांनी विहिरी जवळ मोठी गर्दी केली होती.जेसीबीच्या साह्याने माती सरकवुन दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे गावालगत असलेल्या शेत शिवारात रमेश रामचंद्र धांडे या शेतकऱ्याची विहीर खोदण्याचे काम सुरू होते.यामध्ये प्रल्हाद उकंडी देवकर वय 47 राहणार एकलासपुर ता.रिसोड व प्रकाश रावसाहेब देशमुख वय 45 वर्षे राहणार मोठेगाव ता.रिसोड हे दोघेही विहिरीत मध्ये ड्रिलिंग चे काम करत होते अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली.यादरम्यान अचानक विहीर खचली व यामध्ये सदर दोन्हीही मजुर दबले व त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच रिसोड येथील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून या ठिकाणी पाहणी केली.या दुर्दैवी घटनेने एकलासपुर गावावर शोककळा पसरली आहे.