logo

पत्रकार बांधव व पतंजली योग समितीने केला भन्साळी टाकळी येथील आश्रमात होळी मिलन कार्यक्रम अनाथ मुलांसोबत साजरा

सावनेर :-
तालुक्यातील भन्साळी टाकळीच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या गरीब व अनाथ मुलांसोबत पतंजली योग समिती, व्हॉईस ऑफ मीडिया सावनेर,राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ सावनेर व सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि.१४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून रंगोत्सव साजरा केला.
अनाथ मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते राहुल सावजी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी मराठी आणि हिंदी गाण्याच्या संगीताच्या तालावर तार धरत मुले व उपस्थित सदस्यांनी एकमेकांना रंग लावत आनंद घेतला.याबरोबरच मुलांसाठी अल्पोहार,पिचकारी व वेगवेगळ्या रंगाचे नियोजन असल्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.
या होळी मिलन व रंगोत्सव कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष लीलाधर पिंपळे,सचिव प्रेमाबाई ठाकूर,सरपंच प्रमोद पिंपळे, उपसरपंच पवन ठाकूर, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडमारे,सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटोळे,कैलास शर्मा,नृत्य कलाकार आकाश बरबटे,दत्त पॅरामेडिकलचे संचालक जामुवंत वारकरी, पतंजली योग समितीचे भरत थापा, मनोहर दिवटे,सुरेश चाचरकर, दीपक हरणे,मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव टेकाडे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद मानकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल सावजी,मनोहर घोळसे,संजय टेंभेकर,पुरुषोत्तम नागपूरकर,गिरीश आंदे,संतोष धानोरकर,दिनेश चौरसिया,नितेश गव्हाणे,अनुप पठाणे,गजानन चौधरी,चंदू मडावी गजानन लाडेकर,सचिन लीडर, शुभम बागडे दशरथ मते आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन संजय टेंभेकर यांनी केले तर राहुल सावजी यांनी आभार मानले.

76
8275 views