logo

पाचोरा येथील चिंतामणी हाॅस्पिटल चे नविन भव्य वास्तुत स्थलांतर सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार....!

पाचोरा येथील चिंतामणी हाॅस्पिटल चे नविन भव्य वास्तुत स्थलांतर सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथील अनेक वर्षांपासून रुग्णांना रुग्ण सेवा देऊन जीवदान देणारे डॉ विशाल पाटील यांच्या चिंतामणी हाॅस्पिटल चे नविन भव्य वास्तुत स्थलांतर सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
आपणांस सहर्ष निमंत्रण देण्याचे औचित्य असे की, आमच्या श्री कुलस्वामिनींच्या कृपेने व आपल्या सदिच्छा, आशिर्वाद व सहकार्याच्या बळावर आमचे पाचोरा येथील देशमुखवाडी येथील चिंतामणी हॉस्पिटलचे नविन वास्तुमध्ये स्थलांतर सोहळा हा दिनांक १५ मार्च २०२५ शनिवारी होत आहे.
या अद्यावत हॉस्पिटलचे नविन ठिकाण हे सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील विद्यामंदिर देशमुख वाडी या शाळेच्या समोर संपन्न होत आहे.
तिर्थप्रसादाची वेळ ही सकाळी 10:00 वाजेपासुन आपल्या आगमनापर्यंत तरी आपण या कार्यक्रमास येऊन आम्हास उपकृत करावे हि विनंती आपल्या आगमनाचे आम्ही मनापासुन स्वागत करीत आहोत. या चिंतामणी हाॅस्पिटल च्या नवीन वास्तु चे उद्घाटन हे पाचोरा-भडगाव चे आमदार मा.श्री. किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे,पाचोरा भडगाव चे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या शुभहस्ते मेडिकल चे उद्घाटन संपन्न होत आहे ,आय.सी.यु. चे उद्घाटन हे निर्मल सीडस् पाचोरा चे संचालिका मा.सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात येईल, भा.ज.पा.तालुकाध्यक्ष
मा.श्री. अमोलभाऊ शिंदे यांच्या शुभहस्ते डॉ.कॅबीन चे उद्घाटन करण्यात येत आहे. या नवीन वास्तु सोहळ्यास मा.उपप्राचार्य प्रा.श्री. सुरेश रंगराव सोनवणे(पाटील) यांच्या अर्धांगिनी सौ. विद्या सुरेश सोनवणे, मा.उपप्राचार्य प्रा.मा.श्री. यशवंतराव सुपडू पवार ,सौ. शोभा यशवंतराव पवार यांच्या शुभ आशिर्वाद लाभणार आहेत. डॉ भुषण मगर (विघ्नहर्ता हॉस्पिटल) सन्माननिय पाचोरा डॉ. असोसिएशन सन्माननिय मित्र परिवार,डॉ. नरेश गवांदे (श्रीनिवास हॉस्पिटल) तसेच सन्माननिय सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

निमंत्रक
श्री. प्रशांत सुरेश पाटील Asst. Vice President Axis Bank,
सौ. स्मिता प्रशांत पाटील M.Sc.,
डॉ. विशाल सुरेश पाटील M.D. Physician,
सौ. डॉ. प्रियंका विशाल पाटील B.A.M.S.

4
1189 views