logo

Suresh Dhas : खोक्याला अटक; सहआरोपी करण्याच्या मुद्यावर धस चिडले राखी राजपूत राखी राजपूत | Updated on: Mar 12, 2025


Suresh Dhas : खोक्याला अटक; सहआरोपी करण्याच्या मुद्यावर धस

सहआरोपी करायला भाजीपाला आहे का? कसेपण सहआरोपी होतात का? असा उलट सवाल आमदार सुरेश धस यांनी आज माध्यमांसमोर बोलताना केला आहे. बीड जिल्ह्यात मारहाण प्रकरणात चर्चेत आलेल्या सतीश भोसले याला आज पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक केली आहे. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश उर्फ खोक्या याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. त्यानंतर आता सतीश भोसलेच्या प्रकरणात सुरेश धस यांना देखील सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी जोर धरत आहे. त्यावर विधिमंडळाच्या आवारात सुरेश धस यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना धस म्हणाले की, भोसलेला अटक झाली ही चांगली गोष्ट आहे. तो चुकला, त्याला शिक्षा व्हायला हवी. मी यात हस्तक्षेप करणार नाही. सहआरोपी करण्याची मागणी होत असल्याच्या माध्यमांच्या प्रश्नावर मात्र धस वैतागलेले दिसले. आका, खोका अन सहआरोपी करा हे जे सुरू आहे, तर सहआरोपी करायला काय भाजीपाला आहे का? कोणालाही सहआरोपी करता येतं का? असा उलट प्रश्नच धस यांनी विचारला.

0
109 views