
मौजे बोरगाव तालुका माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालय व कै विजयकुमार उर्फ बाबासाहेब शंकराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव महिला दिनानिमित्त कार्यक्रम करण्यात आला
मौजे बोरगाव तालुका माळशिरस येथील, श्रीनाथ विद्यालय व कै. विजयकुमार उर्फ बाबासाहेब शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, बोरगाव येथे 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे प्राचार्य श्री .रेपाळ राजेंद्र लक्ष्मण हे होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व वक्त्या म्हणून सांगोला कोर्टातील सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या अॅडवोकेट. नेत्रजा वासुदेव पाटील,उपप्राचार्य श्री. भुजबळ सर, पर्यवेक्षक श्री.लष्कर सर, माता पालक, सर्व शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व माता-भगिनींचा सत्कार करण्यात आला. अनेक विद्यार्थीनी जिजाऊ,सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई पाटील ,रमाबाई, डॉक्टर, वकील, अशा थोर महिलांचे वेशभूषा सादरीकरण करण्यात आले. तसेच महिला दिनावर आधारित नृत्य व बाईपण भारी देवा नाटिका यांसारखे कार्यक्रम सादर करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. जवंजाळ मॅडम,व शिक्षक मनोगत श्रीम.पाठक मॅडम यांनी व्यक्त केले .आभार श्रीम. सूर्यवंशी मॅडम व सूत्रसंचालन श्रीम. पाटील.ए.व्ही मॅडम यांनी केले. अशाप्रकारे श्रीनाथ विद्यालय बोरगाव येथे महिला दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदाने पार पडला.