logo

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने महिला दिन व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न*

*कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने महिला दिन व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न*

८ मार्च २०२५ शनिवार रोजी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन च्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे सौ मनीषा ताईपांडे व सौ प्रिया सोनवणे यांनी भारतीय परंपरेने मान्यवरांचे औक्षण केले. यावेळी KPM फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष, सन्माननीय श्री. सुनीलसिंह परदेशी, राष्ट्रीय सचिव, श्री राजेंद्र अहिरे, राष्ट्रीय डायरेक्टर सौ आरती अहिरे, सौ सीमाताई पंडित,स्वातीताई आफळे, उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्री अरविंद सोनवणे, वात्सल्य हॉस्पिटलचे संचालक डॉ राहुल सोनवणे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सटाणा सेंटरच्या संचालिका ब्रह्मकुमारी अंजूदीदी ब्रह्मकुमारी वृषाली दिदी, प्रखर न्यूज वाहिनीचे पत्रकार भैय्यासाहेब माळी भगवानदादा पवार, सौ जिजाबाई सोनवणे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. समाजात संघर्षाने व कष्टाने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ७ माता-भगिनींचा सत्कार करण्यात आला, यामध्ये लोहनेरच्या सरपंच सौ मोहिनी आहेर, सौ नलिनी जाधव, श्रीमती नंदाताई परदेशी, निकिता आर्टिकल्स च्या संचालिका सौ मानसी सोनवणे, सप्तशृंगी आनंद आश्रमच्या संचालिका सौ सरिताताई पगार, सिद्धी पंडित मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीच्या संचालिका, कुमारी सिद्धी पंडित, तसेच श्रीमती मनीषा जाधव यांचा संविधान प्रेम व KPM चे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर KPM फाउंडेशनच्या बागलाण तालुक्याच्या अध्यक्ष, सन्माननीय श्रीमती वैशाली सोनवणे यांनी प्रास्ताविक केले, ज्येष्ठ मार्गदर्शिका श्रीमती ज्योती ठाकरे व मार्गदर्शक सन्माननीय श्री अरविंद सोनवणे, डॉक्टर राहुल सोनवणे, सौ आरती आहेर, श्री सुनीलसिंह परदेशी, सौ मनीषाताई पांडे, पुजा दंडगव्हाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आपल्या मनोगतातून समाजामधील माता-भगिनींचा सन्मान केला पाहिजे आणि तो आदर्श पुढच्या पिढीपर्यंत नेला पाहिजे असे आवाहन करत, कुठेही माता-भगिनींना जर आपल्या मदतीची गरज पडली तर केव्हाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देखील त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी कुमारी. श्रीशा पवार, पूर्वा दात्रे यांच्या नृत्य अविष्काराने सर्वांचे मन जिंकले. त्यानंतर KPM फाउंडेशनमध्ये, नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा नियुक्तीपत्र देऊन व आयडी कार्ड देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सौ लीलावती कापडणीस, मनीषाताई मनोज पांडे, डॉ .सौ. सुष्मिता सोनवणे, ज्योतीताई ठाकरे, वैशालीताई सोनवणे, कल्याणी धोंडगे, पुष्पलता पाटील, मीनाक्षी सोनवणे, अपर्णा येवलकर, स्वाती सोनवणे, मोहिनी आहेर, पूजा दंडगव्हाळ, राजश्री पंडित, कविता जाधव, सपना खोंडे, मालती चव्हाण, सुनिता वाघ, छाया सोनवणे, हर्षाली बिनायक्या, शारदा जाधव, प्रियंका पगार, कल्पना पाटील, हेमलता येशी, सुनंदा पगारे, आशा येवले, प्रिया सोनवणे, खुशबू देवरे, नीलम सोनवणे, अश्विनी बागुल, भाग्यश्री जाधव, सुनिता शिंदे, पोर्णिमा शिवदे, सुनिता गांगुर्डे, जागृती सोनवणे, नलींनी जाधव, राजवर्धन सोनवणे, तेजस पवार, गणेश बोरसे, ऋषिकेश देवरे, सुमित देवरे, अंकुश देवरे, पवन देवरे, पुष्कर धाबळे, भूषण सोनवणे या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कल्याणी धोंडगे व सौ अपर्णा येवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ कविता जाधव यांनी केले. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यासाठी बागलाण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकजुटीने प्रयत्न केले, कार्यक्रमासाठी वात्सल्य हॉस्पिटलच्या संचालिका सौ सुष्मिता सोनवणे, डॉक्टर राहुल सोनवणे यांनी हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल बागलाण तालुक्याच्या अध्यक्ष वैशालीताई सोनवणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून यापुढेही अशाच मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. तसेच KPM च्या माध्यमातून संपूर्ण बागलाण तालुक्यात चांगलीं कामगिरी करून सदस्य वाढवण्यासाठी प्रयत्न करून KPM ला नावलौकिक मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी दिले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करुन कार्यक्रम छान संपन्न केला, त्याबद्दल KPM फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री सुनील सिंह परदेशी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांनी बागलाण टीमचे कौतुक केले.

145
7579 views