logo

लिंबोळी वर्गीय झाडे देऊन सहयोग बँकेचा जागतिक महिला दिन साजरा

*लिंबोळी वर्गीय झाडे देऊन सहयोग बँकेचा महिला दीन साजरा.*
प्रतिनिधी.......
नागपूर ग्रामीण:काटोल
सहयोग बँकेच्या काटोल शाखेमध्ये 8 मार्च ला 'जागतिक महिला दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी सहयोग बँकेचे शाखा व्यवस्थापक-मा.श्री. हेमंतजी चरडे सर व JLL मायक्रो फायनान्स विभागाचे ब्रांच मॅनेजर-मा. श्री. अनुप सर यांच्या मार्गदर्शनात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी बँकेच्या महिला पदाधिकारी व कर्मचारी यांना निंबोडी वर्गीय झाडे देऊन महिला दिन साजरा करण्यात आला.बँकेचे बी.डी.ओ. तसेच जीवनकरिता सो. फाउंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक मा.विकासजी सोमकुवर यांनी महिला ची जगण्याची वाट कशी काटेरी असते हे समजून दिले. नोकरी करून प्रपंच चालवणे ही तारेवरची कसरत असते. व ही काटेरी वाट प्रत्येक नोकरी करणाऱ्या महिलेच्या वाटेला येत असते. ते पेलण्याची ताकद ज्या महिलेमध्ये असते ती जीवनात यशस्वी होते.असे मत व्यक्त केले.
शाखा व्यवस्थापक-मा.श्री. हेमंतजी चरडे सर यांनी पदाधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. महिला दिनानिमित्त सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

44
5066 views