logo

तरुणावर जुन्या वादातून प्राणघातक हल्ला( जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र )

तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; शनिपेठ परिसरातील घटनेने खळबळ

खान्देश टाइम्स न्यूज l ८ मार्च २०२५ l जळगाव l शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या शनिपेठ परिसरात येथे 7 मार्च शुक्रवार रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका तरुणावर चार ते पाच जणांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवून त्याच्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान संवेदनशील परिसर मानल्या जाणाऱ्या शनिपेठ भागात अशा प्रकारे एका तरुणावर प्राण घातक हल्ला झाल्यावरही शनिपेठ पोलिसांनी तातडीने कुठलीही कारवाई न केल्याचे दिसून आले आहे. या घटनेला वीस तासाहून अधिक काळ लोटला तरी अद्याप आरोपी पोलिसांना गवसले नाही. दरम्यान गंभीर जखमी राहुल शिंदे याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राहुल शिंदे आणि त्याचा मित्र आकाश शक्ती सिंह राजपूत हे शनिपेठ भागातून जात असताना जुन्या वादातून संशयित सिंधू निध्यान , निलेश हसकर आणि इतर दोन ते तीन जणांनी येऊन राहुल शिंदे याच्यावर हत्याराने वार करून डोक्याला गंभीर दुखापत करीत जबर जखमी केले. ही घटना रात्री 7 मार्च रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी :

राहुल शिंदे याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याची माहिती कळताच शिंदे यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेऊन गर्दी केली होती.

0
13 views