जागतिक महिला दिन साजरा
8 मार्च-दिवा ठाणे : जनविकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री जयसिंग कांबळे यांनी हा कार्यक्रम आरंभ स्कूल गणेश नगर दिवा येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. त्यानिमित्ताने सामाजिक शैक्षणिक धार्मिक तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर महिलांचा नारी शक्ती गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिला भगिनींचा हळदी कुंकू समारंभ करून त्यांचेही स्वागत करण्यात आले. संस्थेचे इतर पदाधिकारी व मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व भगिनींना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला खास प्रमुख पाहुणे वक्ते योगरत्न श्री रत्नकांत म्हात्रे उपस्थित होते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते नेहमीच अशा कार्यक्रमाना आवर्जून उपस्थित राहतात आणि समाजातील बंधू-भगिनींना मार्गदर्शन करीत असतात " आपले आरोग्य आपल्या हाती " या विषयावर त्यांनी योग व त्याचे महत्त्व तसेच निसर्गोपचार याविषयी माहिती दिली. नियमित योग कसे करावे हे प्रात्यक्षिक स्वरूपात त्यांनी दाखवले. योगासने प्राणायाम कसे करावे ,आपला आहार विहार कसा असावा, आपले आरोग्य नेहमी निरोगी कसे ठेवावे. त्यासाठी घरातील असलेल्या अन्नधान्याचा वस्तूंचा कसा वापर करावा हे त्यांनी समजावून सांगितले. त्याचप्रमाणे मुलांचे संगोपन कसे करायचे. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपले आरोग्य कसे उत्तम ठेवावे. असे सर्वांगीण स्वरूपाची माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केले. श्री रत्नकांत म्हात्रे यांनी आयोजकांचे सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच उपस्थित सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेचे समाजसेवक श्री संदीप पाटील यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले. अध्यक्ष श्री जयसिंग कांबळे यांनी सर्व मान्यवरांच तसेच महिला भगिनींचे, उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.