
जागतिक महिला दीना निम्मित रायपुर पोलिसांनी दाखवली महिला व विद्यार्थिनी प्रती संवेदनशीलता महिला व विद्यार्थिनींसाठी रायपूर बस स्टँड येथे केली आसन व्यवस्था.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे शंभर दिवस कार्यक्रम अनुषंगाने रायपूर पोलिसांनी महिला व विद्यार्थिनी यांच्यासाठी संवेदनशीलता दाखवून दिली आहे. रायपूर हे चिखली व बुलढाणा या दोन मोठ्या शहरांना लागून असलेले गाव असून याठिकाणीचे बऱ्याच महिला व विद्यार्थिनी ह्या शैक्षणिक कामानिमित्त तसेच महिला या बाजार किंवा इतर कामानिमित्त दैनंदिन बाहेर शहरात जातात किंवा आजूबाजूच्या खेड्यामधून रायपूर येथून मोठ्या प्रमाणात महिला व विद्यार्थिनी रायपूर येथे दैनंदिन येत असतात रायपूर गावात बस स्टँड परिसरात महिलांना हक्काचे उभे राहण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नव्हती, त्यामुळे वाहनांची वाट पाहताना त्यांना ताटकळत उभे राहावे लागत होते, व बसण्यासाठी सुद्धा कोणतीही जागा त्या ठिकाणी नव्हती ही बाब पोस्ट रायपूरचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश राजपूत यांच्या लक्षात आली पोलीस प्रशासनातील संवेदनशील व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असल्याने त्यांनी या संवेदनशील प्रश्नावर काहीतरी उपाय करावा व महिला व विद्यार्थिनींसाठी हक्काची बसण्याची व्यवस्था रायपूर बस स्टॅन्ड येथे करावी या विचारातून त्यांनी पोलीस स्टेशन रायपूरच्या महिला व पोलीस अंमलदारांना एकत्र घेऊन प्रथम रायपूर बस स्टँड येथे असलेले अतिक्रमण काढून घेऊन त्या ठिकाणी प्रथम वाहतूक पोलीस चौकी उभारली व त्याच बाजूला महिला व विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था केली जेणेकरून महिला व विद्यार्थिनींना तेथे बसण्यासाठी कोणतीही भीती त्यांचे मनात राहू नये व शेजारीच वाहतूक चौकी व पोलीस असल्याने सुरक्षितता देखील राहील, अशा प्रकारे महिलांसाठी संवेदनशीलता दाखवून रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत व रायपूर चे सर्व पोलीस अंमलदार यांनी एक आगळा वेगळा उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त घडवून आणला व आज रायपूर बस स्टँड येथे महिला व शालेय विद्यार्थिनी यांचे उपस्थिती सदर आसन व्यवस्था व वाहतूक चौकी याचे उद्घाटन मां.पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे , अपोआ श्री महामुनी यांचे मार्गदर्शनानुसार मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील सर यांचे हस्ते एका चिमुकल्या शालेय विद्यार्थिनी कडून करण्यात आले व सर्व महिला यांचे जागतिक महिला दिननिमित्त गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आले .
सदर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून स.पो.नी श्री स्वप्निल नाईक जिल्हा वाहतूक हे तसेच ठाणेदार दुर्गेश राजपूत, प्रतिष्ठित नागरिक बाळूशेठ जैस्वाल व इतर नागरिक व रायपूर पोलीस अंमलदार उपस्थित होते .
समाजाने महिलांप्रती किती संवेदनशील असावे याबाबत रायपूर पोलिसांनी एक आगळे वेगळे उदाहरण निर्माण केले आहे..