
विचार मांडा या अभियानात इंद्रमोहन कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला
विचार मांडा अभियान निकाल –
पक्षातर्फे भारतातील शिक्षणाची अवस्था आणि सामाजिक स्थिती या विषयावर विचार मांडा अभियान मागील महिन्यात घेण्यात आले. त्याला पक्ष सदस्य तसेच इतर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
एकूण 10 जणांनी स्वतःचे विचार पक्षाकडे पाठविले. त्यातील 5 विचार हे खरे तर विषयाला धरुन नव्हते त्यामुळे त्यांचा विचार केला गेला नाही.
पण एकूणच आज भारतामध्ये किती अराजकता माजली आहे तसेच भारतीय नागरिकाची काय भावना आहे हे पक्षाला समजले.
बाकी 5 लेखांपैकी साविनी कुलकर्णी, पुणे यांनी देखील चांगले विचार लेखाद्वारे मांडले परंतु, त्यांचा लेख पक्षाकडे अंतिम दिनांका नंतर दोन दिवसांनी आला त्यामुळे त्यांच्या लेखाचा विचार करता आला नाही.
उरलेल्या लेखांमध्ये श्री. इंद्रमोहन कदम, बीड यांनी उत्तम प्रकारे पक्षाच्या विचारांशी सुसंगत असे विचार मांडले त्यामुळे श्री. इंद्रमोहन कदम, बीड यांना लोकसंघर्ष पक्ष, आयोजित पहिली विचार मांडा स्पर्धेचे रु. 1,000/- चे पारितोषिक जाहीर करण्यात येते.
श्री.इंद्रमोहन कदम यांचे पक्षाकडून अभिनंदन आणि पुढील पक्ष कार्यास शुभेच्छा