logo

सामाजिक बदलासाठी मानस फाउंडेशनचे पुन्हा एक पाऊल जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर घेणार विधवा परिषद


मन्सूर शहा.💥💥AIMA NEWS 💥 💥 बुलडाणा :--- 8 मार्च जागतिक महिला दिवस जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्राध्यापक डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेत माणस फाउंडेशन व राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था हरसोडा द्वारा विधवा परिषद घेऊन हा दिवस आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे विधवा महिलांच्या आडी अडचणीवर चर्चा घडवून आणन्या सह त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती देखिल दिली जाणार आहे. मलकापूर नगरीत होत असलेल्या या परिषदेला जिल्हाधिकारी किरण पाटील व माजी आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
विधवा महिला हा समाजातील दुर्लक्षित घटक ठरलाय. वर्षानुवर्ष विधवा महिलांना सामाजिक कुचंबनेला तोंड द्यावे लागत आले आहे. पती निधनानंतर विधवांची अवस्था अतिशय दयनीय होऊन जाते. एकीकडे सामाजिक हेटाळनी , दूषित दृष्टिकोन तर दुसरीकडे हक्कासाठी संघर्षाकरता उभे राहावे लागते. यामध्ये त्यांची अवस्था अतिशय बिकट होऊन जाते. विधवा ह्या सुद्धा समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक असून त्यांनाही जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. या महिलांना त्यांचे हक्क मिळावे व समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी प्रयत्न चालवले आहे. माणस फाउंडेशनने बुलढाण्यात विविध सामाजिक उपक्रम हाती घेत सामाजिक बदलाचे पाऊल टाकले आहे. त्याला राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था हरसोडा तालुका मलकापूर यांनि प्रतिसाद देत मलकापूर येथे 8 मार्च रोजी एकल महिला परिषद व परिचय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी किरण पाटील हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे राहणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती वेदिका सजगाणे गटविकास अधिकारी मलकापूर , राहुल तायडे तहसीलदार मलकापूर, संतोष रायपुरे यांच्यासह मानस फाउंडेशनचे संकल्पक प्राध्यापक डी.एस. लहाने याची उपस्थिती राहणार आहे. भातृमंडळ, चाळीसबिघा येथे आयोजित परिषदेला बहुसंख्यने उपस्थिती राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

1
84 views