वनारे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मुंबई राजभवन येथे शैक्षणिक भेट
दि.5 मार्च 2025 | मुंबई.
आज वनारे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मुंबई दर्शनासाठी आले होते. यावेळी माझ्या कार्यालया मार्फत विद्यार्थ्यांना राजभवन सफर करण्यासाठी मदत केली. राजभवन येथे दरबार हॉल मध्ये बसून राजभवनाची माहिती आणि बँक्वेट हॉल मध्ये चहापानाची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांची समुद्रसफर झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले.