
शिक्षणमहर्षी बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार मकरंद अनासपुरे यांना जाहीर,
९ मार्च रोजी परतूरात वितरण सोहळा
शिक्षणमहर्षी बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार मकरंद अनासपुरे यांना जाहीर,
९ मार्च रोजी परतूरात वितरण सोहळा
परतूर (प्रतिनिधी) :-
येथील मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा २०२५ सालचा शिक्षणमहर्षी स्व.बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला आहे.
स्व.बाबासाहेब (भाऊ) आकात यांच्या जयंतीदिनी ९ मार्च रोजी परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते मकरंद अनासपुरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कपिल आकात यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ.रणजितसिंह निंबाळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य,प्राचार्य डॉ.भागवत कटारे, प्राचार्य डॉ.शिवाजी मदन यांची उपस्थिती असणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. कुणाल आकात, रसायनशास्त्र विभागाचे डॉ.भास्कर साठे,अधिसभा सदस्य डॉ. मुंजा धोंगडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कवी डॉ.दासू वैद्य, प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे, डॉ.अशोक पाठक यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.
रविवारी सकाळी १० वाजता आयोजित या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समन्वय समितीचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे, प्राचार्य डॉ. माणिकराव थिटे,डॉ.सुधाकर जाधव, डॉ.शेषराव वायाळ, मुख्याध्यापक एल.के.बिरादार, राजेश नवल यांनी केले आहे.