logo

बाजड परिवार वाढदिवसानिमित्त नवीन नवीन उपक्रम राबवितात यावर्षीही पशुपक्ष्यांसाठी घरटे व मुख प्राण्यांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आहे

वाढदिवसानिमित्त पशुपक्ष्यांसाठी घरटे आणि पाण्याची व्यवस्था

बाजड परिवाराचा नवा आदर्श

रिसोड येथील सदा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा पत्रकार रुपेश पाटील बाजड व बाजड कुटूंबायनी पुढाकार घेऊन यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता पशुपक्ष्यांसाठी घरटे आणि पाण्याची व्यवस्था केली.
हल्ली वाढदिवस म्हटला की गुच्छ फुले केक कापणे अशा प्रकारची फॅशन झाली आहे मात्र वाढदिवस ही एक आनंदाची पर्वणी असते ती साजरी झालीच पाहिजे आणि करायलाही पाहिजे त्या अनुषंगाने आपला वाढदिवस कुठे साजरा होतो याला तेवढेच महत्त्व आहे.
युवा पत्रकार रुपेश पाटील बाजड यांच्या पत्नी सौ लक्ष्मी रुपेश बाजड यांच्या वाढदिवसानिमित्त नवचेतना ग्रुप यांच्या माध्यमातून आणि रुपेश पाटील बाजड यांच्या पुढाकारातून गुरांसाठी पाण्याचा हौद चिमण्यांसाठी घरटे आणि पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे.
त्यामुळे या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळून पशुपक्षी आणि गुरांसाठी पाण्याच्या हौद याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मानव भौतिक सुखांच्या मागे लागला आहे. जगणे डिजिटल झाले आहे. सिमेंटचे जंगल वेगाने फोफावत आहे. मात्र, यामुळे निसर्गाचे संतुलन वेगाने ढासळतेय. पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने हवामानाचे तंत्रही बिघडले आहे. पशुपक्षी नामशेष होत आहेत. निसर्गाचे संतुलन तोलण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पशुपक्षी जगण्यासाठी धडपडत आहे. निसर्गाचे हे धन खरेच जपायचे असेल तर पशुपक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय समाजातील प्रत्येक घटकाने आवर्जून करावी, असे मत पक्षिप्रेमी रुपेश पाटील बाजड यांनी केली व्यक्त केले आहे.
उन्हाळा म्हणजे जीवाची काहिली करणारा. आसपास दाहक वातावरण, निष्पर्ण होत चाललेले वृक्ष, कोरडे पडत चाललेले जलसाठे. या सगळ्यांचा परिणाम संपूर्ण सृष्टीवर जाणवतेय. मग पक्ष्यांची आणि प्राण्यांची कथा ती काय, सिमेंटच्या जंगलात थेंबभर पाण्यासाठी तगमगणारे पक्षी आणि पाण्याच्या एका घोटासाठी भरकटणारे पशू पाहिले की अंगावर सर्रकन काटा येतो. पशुपक्ष्यांनी पाण्यासाठी दिलेली मूक आर्त हाक मनुष्यांपर्यंत पोहोचणे खरे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळून रिसोड शहरांमध्ये ठीक ठिकाणी पक्षांसाठी घरटे आणि पाणी आणि एका ठिकाणी गुरांच्या पाण्याच्या हौदाची व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे.
त्यामुळे वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता पशुपक्ष्यांसाठी दाणा पाण्याची व्यवस्था करावी अशी आवाहन रुपेश पाटील बाजड यांनी केले.
यासाठी रिसोड येथील नवचेतना ग्रुपचे विनोद बांगर यांनी पुढाकार घेतला असून ज्यांना ज्यांना घरटे व पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे त्यांनी नगर परिषद चे पाणीपुरवठा कर्मचारी विनोद बांगर यांच्याशी संपर्क करावा...

28
1368 views