आपल्या परिसराला जलसमृद्धी यावी व गावात जलस्वराज्य व्हावं यासाठी " चैतन्य जागृती यात्रा" ची 3 मार्च या जागतिक वन्यजीव दिनापासून सुरुवात केली
आपल्या परिसराला जलसमृद्धी यावी व गावात जलस्वराज्य व्हावं यासाठी " चैतन्य जागृती यात्रा" ची 3 मार्च या जागतिक वन्यजीव दिनापासून सुरुवात केली.
🌳गावातील जागरूक नागरिकांशी संवाद साधून जलसमृद्धी होण्यासाठी आपण गटतट सोडून एकत्रित येणे किती फायद्याचं आहे याची चर्चा झाली.
🌳 पुढील चैतन्य जागृती यात्रेचे वेळेनुसार व परिसर अनुसार नियोजन झाले.
🌳शाश्वत विकासाच्या नऊ ध्यान बद्दल चर्चा झाली व त्यासाठी सर्व मिळून प्रचार प्रसार व अंमलबजावणी साठी जनजागृती करण्याचे ठरले
🌳 सर्व ग्रामस्थांच्या मताधिक्याने गावच्या नदीला नदी प्रहरींची नेमणूक करण्यात आली
त्याचप्रमाणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार गावकाऱ्यांकडून करण्यात आला.
अश्या प्रकारे चैतन्य जागृती यात्रेच्या पहिल्या दिवसाची वाटचाल झाली.