
झाकलवाडीत शिबिराचा समारोप: सेवाभाव आणि समर्पणाचे प्रतीक
वाशिम: श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था झाकलवाडी ता. जि.वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनाच्या सुरू असलेल्या शिबिराचा समारोप कार्यक्रम दि. 1/03/25 रोजी ग्राम झाकलवाडी येथे पार पडला. दि. 23/02/25 ते 2/03/25 पर्यंत या कालावधीत शिबिरा मार्फत अनेक सामाजिक जनजागृती करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी गावामध्ये जाऊन स्वच्छता अभियान, स्वच्छता रॅली काढण्यात आली, क्षयरोग नियंत्रण रॅली सामाजिक समस्यांवर पथनाट्य सादर केले जसे बालविवाह, व्यसनमुक्ती, कौटुंबिक हिंसाचार, क्षयरोग नियंत्रण अशा विविध ज्वलंत विषयी पथनाट्य सादर करून गावामध्ये जनजागृती करण्यात आली तसेच उत्तम असे बौद्धिक सत्र सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. शिबिरातील विद्यार्थ्यांनी शिबिरामध्ये अनेक परिश्रम केले व सामाजिक कार्यातून गावातील लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक उपस्थित होते तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला व त्यांनी शिबिरामध्ये घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक सुद्धा केले. त्याचप्रमाणे सरपंच लक्ष्मण गावंडे ,ग्रामपंचायत सदस्य सय्यद याकूब, श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय सर्व प्राध्यापक व जि.प.शाळा. झाकलवाडी सर्व शिक्षक तसेच तंटामुक्ती अध्यक्ष, उपस्थित होते. श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय साळीवकर उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना समाजकार्य संदर्भात प्रोत्साहन दिले. रा.सो.या.च्या कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. मनीषा कीर्तने सह कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय वानखेडे उपस्थित होते. तसेच सय्यद युनूस , सय्यद नूर, , विशाल कव्हर, अनंत ढोले,श्रावणी राजनकर, शामल राजनकर, सीमा शृंगारे, शितल भुरके सह आधार बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ.मनिषा किर्तन यांनी सांगितले.सूत्रसंचालन यश मागे, वैष्णवी पानझाडे, करण मिटकरी, दीक्षा खिल्लारे यांनी केले.व आभार प्रदर्शन रा.से.यो.सह कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय वानखेडे यांनी केले. सर्व समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी खूप परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.