logo

ग्राम झाकलवाडीत सामाजिक जनजागृतीचा उत्साह...!

वाशिम .श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था झाकलवाडी ता.जि.वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 फेब्रुवारी 2025
वार बुधवार रोजी एक महत्त्वपूर्ण सामाजिक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आणि जनजागृती केली गेली. समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष गावामध्ये जनजागृती पर रॅली मार्फत जाऊन सामाजिक समस्यांवर पथनाट्य सादर केले यामध्ये व्यसनमुक्ती ,कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, या ज्वलंत विषयावर पथनाट्य सादर करून गावामध्ये जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजकार्याचे विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये बेटी बचाव बेटी पढाव याविषयी माहिती देण्यात आली तसेच राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम याविषयी विद्यार्थ्यांच्या भर पडली तसेच राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एक नवीन उमेद निर्माण झाली. सायंकाळी उद्बोधन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमांमध्ये अ‍ॅड. राधा नरवालिया, श्री संजय डवरे, श्री दीपक भालेराव हे मार्गदर्शक उपस्थित होते तसेच रा.सो.या.च्या कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. मनीषा कीर्तने, सहकारी अधिकारी प्रा. विजय वानखेडे, आणि आधार संस्थेचे सय्यद युनुस , सय्यद नूर , विशाल कव्हर, अनंत ढोले श्रावणी राजनकर, सीमा शृंगारे , हे पदाधिकारी हजर होते. विविध मुद्द्यावर चर्चा करून जनजागृती करून आणि जनतेला मार्गदर्शन करून हा कार्यक्रम खरोखरच प्रशंसनीय ठरला.

8
1904 views