
ट्विटरवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी करिश्मा अजिज विरोधात लातूरमध्ये तक्रार
ट्विटरवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी करिश्मा अजिज विरोधात लातूरमध्ये तक्रार
लातूर – ट्विटरवरून राष्ट्रनायक छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पत्रकार सुरेश चव्हाणके यांच्याविषयी अपशब्द वापरून आक्षेपार्ह टिप्पणी करत इतिहासाची मोडतोड करून औरंगजेबाची स्तुती केल्याच्या प्रकरणी लातूर शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्यात करिश्मा अजिज हिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते हिंदू सेवक श्रीकांत रांजणकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. करिश्मा अजिज हिच्या वादग्रस्त पोस्टमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच हिंदू राजे-महाराज्यांविषयीही अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली असून, कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणावर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.