logo

जिल्हा परिषद शाळा भर जहागीर या ठिकाणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वर्जन टू चा समारंभ

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वर्जन टू चा समारंभ

रिसोड
आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व्हर्जन टू चा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पुणे येथील शाळेतून पार पडला आहे.
सदर कार्यक्रम हा रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषद भर जहागीर येथील शाळेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
एक नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, या उपक्रमाला खासदार अनुप धोत्रे विधानपरिषद आमदार भावना गवळी शिक्षक आमदार किरण सरनाईक आमदार अमित झनक यांनी शुभेच्छा दिल्या असून सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य अमित खडसे, प्राचार्य चोपडे, जिल्हा परिषद मुख्याध्यापक सौ इंगोले, डॉक्टर वाशिमकर, यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (RBSK) हा मुलांच्या जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठीचा एक प्रकारचा कार्यक्रम आहे ज्यामुळे सर्व मुलांना त्यांची पूर्ण क्षमता प्राप्त करता येते; आणि समाजातील सर्व मुलांना व्यापक काळजी देखील प्रदान केली जाते. या कार्यक्रमात जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची ४ डी- जन्माच्या वेळी दोष, रोग, कमतरता आणि विकास विलंब यासाठी तपासणी समाविष्ट आहे, ज्यामध्ये लवकर ओळखण्यासाठी ३२ सामान्य आरोग्य स्थिती आणि तृतीयक स्तरावर शस्त्रक्रियांसह मोफत उपचार आणि व्यवस्थापन समाविष्ट आहे. निवडलेल्या आरोग्य स्थितींचे निदान झालेल्या मुलांना जिल्हा पातळीवर लवकर हस्तक्षेप सेवा आणि फॉलो-अप काळजी प्रदान केली जाते. या सेवा मोफत दिल्या जातात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना उपचारांवर होणारा खर्च कमी करण्यास मदत होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी बोरा, डॉ. पंडितकर डॉ.श्रीकांत देशमुख, डॉक्टर शीतल पवार डॉक्टर शितल बाजड औषध निर्माता श्रीकांत इंगळे महादेव बेंडवाले अमोल खांजोडे परिचारिका सौ पार्वती खंदारे व जिल्हा परिषद शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

5
3054 views