logo

आठवडे बाजार संकल्पना रुजते.

शिवजन्मभूमी आणि महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुक्यातील विकसनशील नगर कल्याण महामार्गावरील " पिंपरी पेंढार गावातील " पिंपरी पेंढार युथ फाऊंडेशन " आणि समस्त गावातील राजकीय पुढारी शासकीय सकारात्मकता यांच्या सहकार्य आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करून मार्च २०२३ प्रत्येक शनिवारी " शेतातील बळीराज शेतमाल डायरेक्ट ग्राहकाच्या हातात " या संकल्पनेवर सुरु झालेला आठवडे बाजार आता दुसर्‍या वर्षात पदार्पण करतोय. शेतमालासह दैनंदिन गरजेच्या वस्तूंना ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून काळाच्या पडद्याआड गेलेली " आठवडे बाजार " ही संकल्पना आताच्या अद्ययावत कृत्रिम प्रज्ञेच्या युगातही रुजू होताना यशस्वीतेकडे मार्गस्थ होताना दिसत आहे. ग्राहकांकडून मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे त्याची अश्वासकता वाढीस लागल्याच सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे.अशाच प्रकारचे आठवडे बाजार पिंपरी पेंढार गावचा आदर्श आणि प्रेरणेतून राज्यातील गावागावात सुरु होवून रुजावेत अशी सकारात्मक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

1
35 views