
मूल होत नसल्याने दाम्पत्याने खरेदी केले बाळ, देहूरोड येथील गंभीर प्रकार, गुन्हा दाखल
याप्रकरणी बालकल्याण समिती -2 पुणे व सी. सी. डि.टी संस्थेच्या ॲड. सुरेखा कांबळे - पाटोळे यांच्या पुढाकारने पोलिसांनी पती-पत्नी आणि अन्य दोन संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला.
मूल होत नसल्याने दाम्पत्याने खरेदी केले बाळ, देहूरोड येथील गंभीर प्रकार, गुन्हा दाखल
याप्रकरणी बालकल्याण समिती -2 पुणे व सी. सी. डि.टी संस्थेच्या ॲड. सुरेखा कांबळे - पाटोळे यांच्या पुढाकारने पोलिसांनी पती-पत्नी आणि अन्य दोन संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला.
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
: स्वतःला मूल होत नसल्याने दाम्पत्याने गर्भवती महिलेला पैसे दिले. खोटे नाव सांगून तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दत्तक प्रक्रिया न करता तिच्याकडून बाळ घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. देहूरोड येथे 28 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नी आणि अन्य दोन संशयित महिलावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बालकल्याण समिती क्र. 2 पुणे यांनी दाखल घेऊन सी. सी. डी. टी. संस्थेच्या ॲड. सुरेखा कांबळे-पाटोळे यांनी शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याला मूल होत नाही म्हणून त्यांनी एका महिलेच्या ओळखीने गर्भवती महिलेला पैसे दिले. त्यानंतर तिला देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी गर्भवती महिलेची खरी ओळख लपवून तिला मूल होत नसलेल्या महिलेचे नाव दिले. त्यानंतर बालकाची खोटी माहिती जन्म नोंदणीच्या घोषणापत्रामध्ये दिली.
बालकाची दत्तक प्रक्रियेबाबत कोणतीही शासकीय नोंद न करता शासनाची दिशाभूल केली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे बालकाची खोटी माहिती देऊन बालकाचा जन्माचा दाखला प्राप्त केला. कॅन्टोन्मेंट रुग्णालय प्रशासनाची फसवणूक करून बालक स्वतःचे आहे असे भासवून संबंधित महिलेला बाळाचे पैसे देऊन ते खरेदी करून स्वःच्या ताब्यात ठेवून घेतले, असे फिर्यादीत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.