logo

रेती के मामले में सहाय्य्क पोलीस निरीक्षक के साथ पोलीस सीपाही अँटी करप्शन हे जाले मे.

रेती के मामले में सहाय्य्क पोलीस निरीक्षक के साथ पोलीस सीपाही अँटी करप्शन हे जाले मे.
परतूर (वा.)
एका वाळू वाहतूक प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात एक लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) सचिन इंगेवाड आणि पोलीस शिपाई गोकुळदास देवळे यांच्यासह खाजगी इसम विष्णू कुरदणे यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्राराचा तपशील
तक्रारदार, वय २६ वर्षे, राजा टाकळी (ता. घनसावंगी, जिल्हा जालना) येथील रहिवासी असून, त्यांच्या ताब्यातील टिपर क्रमांक MH-37 T-2018 संबंधित गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 31/2025 अंतर्गत खाण आणि खनिज अधिनियमासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगेवाड आणि पोलीस शिपाई देवळे यांनी खाजगी इसम विष्णू कुरदणे यांच्यामार्फत तक्रारदाराकडून १.८० लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात टिपर सोडण्यासाठी आणि कारवाईत मदत करण्याच्या बदल्यात आरोपींनी तडजोडीने रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.

सापळा कारवाई
तक्रारदाराने २८ फेब्रुवारी रोजी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर, १ मार्च रोजी पोलिस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला गेला. खाजगी इसम विष्णू कुरदणे यांनी आष्टी येथील लहुजी चौकात असलेल्या सई लस्सी सेंटर येथे तक्रारदाराकडून १.८० लाख रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

तपास आणि अटक

सापळ्यात पकडलेल्या कुरदणे यांच्या अंगझडतीत २२,१७० रुपये रोख, मोटारसायकलची चावी आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपींच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे. इंगेवाड, देवळे, आणि कुरदणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई करणारे अधिकारी आणि टीम

सापळा अधिकारी शंकर शिंदे, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. पोलिस निरीक्षक युनूस शेख आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

5
77 views