logo

लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या मार्गदर्शन मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री मा श्री एकनाथ भाई शिंदे आणि परिवहन मंत्री मा श्री प्रताप सरनाईक साहेब यांना निमंत्रण

लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या मार्गदर्शन मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री मा श्री एकनाथ भाई शिंदे आणि परिवहन मंत्री मा श्री प्रताप सरनाईक साहेब यांना निमंत्रण

लातूर: लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या व महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ च्या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना आमंत्रण देण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

या भेटीदरम्यान संघटनेचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पाडे यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, राज्यभरातील विद्यार्थी वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या समस्या, परवाने, नियमावलीतील सुसूत्रता आणि सुरक्षित प्रवास या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

संघटनेचे मार्गदर्शक हिंदू नायक श्रीकांत रांजणकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. तसेच, युवा सेना जिल्हा प्रमुख श्री. कुलदीप सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

यावेळी शिष्टमंडळात श्री. प्रशांत गिरीम, श्री. कृष्णा जाधव आणि इतर सहकाऱ्यांची उपस्थिती होती. संघटनेच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना निवेदन सादर करत त्यांना लातूर येथे होणाऱ्या मार्गदर्शन मेळाव्यास उपस्थित राहण्याची विनंती केली.

या मेळाव्यात विद्यार्थी वाहतूकदार, शालेय प्रशासन, पालक आणि शासनाच्या विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित असून, राज्यभरातील वाहतूक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

13
2632 views
1 comment