
अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात "ड्रग्स डिस्कव्हरी अँड डेव्हलपमेंट विषयावर अंतरराष्ट्रीय परिषद
संगमनेर :शहाजी दिघे
संगमनेर : अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात "ड्रग्स डिस्कव्हरी अँड डेव्हलपमेंट फ्रॉम कॉन्सेप्ट टू कमर्शियलायझेशन" या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न झाली. या परिषदेत देश-विदेशातील मान्यवर शास्त्रज्ञ, संशोधक, औषधनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्नेहपूर्ण स्वागत केले. जगभरातील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेतला, हे विशेष उल्लेखनीय आहे. औषधनिर्मिती क्षेत्रात वेगाने होणाऱ्या संशोधनामुळे नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असून या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
ही आंतरराष्ट्रीय परिषद विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे महत्वपूर्ण व्यासपीठ ठरली असून औषधनिर्मिती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व नवकल्पना यांचा आदानप्रदान यामध्ये झाला. संशोधनातून समाजकल्याण हा या परिषदेचा खरा उद्देश साकारला गेला.