logo

रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथे सामाजिक व आध्यात्मिक सेवा केंद्राला भेट

रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथे सामाजिक व आध्यात्मिक सेवा केंद्राला भेट

रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथे सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून नवनाथ रघुनाथ मद्दे यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतात श्री पाथरवाडी सेवा प्रकल्पाची स्थापना केली आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर या प्रकल्पास भेट देण्याचा योग आला. यावेळी संघटनेचे मराठवाडा प्रमुख श्री संतोष यादव, श्री चंद्रकांत आवडले श्री पांडुरंग क्षिरसागर, श्री बाबुलाल राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश तरुणांना व्यसनाधिनतेपासून परावृत्त करणे असून, त्यांच्यात भजन, कीर्तन, प्रवचनादी आध्यात्मिक संस्कार रुजवणे हा आहे. तसेच, या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे तसेच उपचार यंत्रणा उपलब्ध करून देण्याचाही मानस आहे.

हे अध्यात्मिक पीठ शहरातील नागरिकांसाठी निसर्गरम्य सहलीचे ठिकाण म्हणूनही विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर मोठे परिवर्तन घडून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

0
42 views