logo

#विकासकाम_भूमिपूजन_सोहळा ✨✌🏻 माझ्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्राचे राज्यसभा माजी खासदार मा. श्री व्ही. मुरलीधरन जी

#विकासकाम_भूमिपूजन_सोहळा ✨✌🏻

माझ्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्राचे राज्यसभा माजी खासदार मा. श्री व्ही. मुरलीधरन जी यांच्या खासदार निधीतून आज गाळेगांव परिसरात अंतर्गत रस्ते व झाकणासह गटार बांधकाम या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमास उपस्थित राहून गाळेगांव परिसरातील नागरिकांशी संवाद साधत मोहने टिटवाळा भागाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे वचन याप्रसंगी उपस्थित नागरिकांना दिले.

या कार्यक्रम प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपा मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर, मा.नगरसेवक जनार्दन पाटील, अनंता पाटील, अपर्णा पाटील, संतोष शिंगोळे, रमेश कोनकर, अनंता पाटील, मोहन कोनकर, सतिश पाटील, भूषण मिश्रा, मुकेशकुमार कनोजिया, विजय पाटील, रामा पाटील, रंजना भामरे, सुरज सुतार तसेच गावातील प्रतिष्ठित-ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवा बांधव, भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#भूमिपूजन #BhoomiPoojan #सोहळा #BJP #NarendraPawar #KalyanWest

16
1529 views