
चाळीसगाव येथे श्रमिक वर्तमान कामगार संघटना शालेय पोषण आहार कामगारांचा मेळावा रविवार २३ रोजी पार पडला.
प्रेस नोट दी. 26 फेब्रुवारी 2025
चाळीसगाव, वर्तमान कामगार संघटना मेळाव्यात या प्रधान शक्तिशाली पोषण आहार स्वयंपाक तथा मदतनीस विविध मागण्याबाबत मंडण्यात आल्या .मेळाव्यास आमदार मंगेश चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष शरद लोहकरे, उपाध्यक्ष डॉ. राऊत, संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष निवृत्ती जाधव, चाळीसगाव तालुकाध्यक्ष नयना
विसपुते यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आश्वासीत केले की, शालेय पोषण आहार योजनेच्या कामगारांच्या विविध समस्यांची दखल घेऊन येणान्या विधानसभा अधिवेशनात मी नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. राज्य शासनाने मागील काळात एक हजार रुपये पगार वाढ करून अशी घोषणा केली होती मात्र शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना आद्यापही एक हजार रुपये मिळालेले नाही याकडे पदाधिकाऱ्यांनी आमदार महोदयांचे लक्ष वेधले.शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्याऱ्यांच्या गेल्या वीस वर्षांपासून खूप मोठ्या समस्या आहेत. त्यांचा पगार हा वेळेवर होत नाही याची खंत आमदार महोदयांकडे मांडली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोहकरे पाटील यांना आमदार मंगेश चव्हाण यांनी येत्या अधिवेशनात शालेय पोषण आहार योजनेच्या कर्मचाऱ्याऱ्यांच्या समस्यांबाबत प्रश्न मांडण्याची ग्वाही दिली.
SP न्युज मराठी साठी चाळीसगाव प्रतिनिधी