logo

ब्रह्माकुमारीजच्या ज्ञानामुळे मनातील अंधःकार दूर होतो.---बीके रुख्मिणी दीदी

द्वादश ज्योतिर्लिंग प्रदर्शनीचे उदघाटन संपन्न

रिसोड/प्रतिनिधी:-प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सिव्हिल लाईन रिसोड येथे द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन प्रदर्शनीचे उदघाट्न 23 फेब्रुवारी रविवारी सायंकाळी 7 वाजता थाटात संपन्न झाले. उदघाट्न समारंभाच्या अध्यक्षस्थानी अकोला वाशिम ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदी तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा विजयमाला आसनकर, ऍड कृष्णा महाराज आसनकर, प्रसिद्ध व्यापारी भारतअप्पा जिरवणकर, प्रतिष्ठित व्यापारी रमणलाल कोठारी, पुष्पाताई कोठारी, रिसोड ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी रमणलाल कोठारी यांनी मनोगत व्यक्त करताना ब्राह्मकुमारीज संस्था सतत समाजाला काहीतरी चांगल देण्याचं सत्कार्य करित असतात. मागितले मनुष्याकडे असणारे दुर्गुण मागतात ते आपण द्यायला पुढे येत नाही.ब्रह्माकुमारीज चे ज्ञान हे आनंदी व सुखी जीवनासाठी अवश्य आहे.
नगराध्यक्षा विजयमाला आसनकर यांनी बोलताना ब्रह्माकुमारीज केंद्राच्या संचालिका ज्योती दीदी विविध अध्यात्मिक उपक्रम राबवून समाजाला संस्कारक्षम बनविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.अशा आध्यत्मिक ज्ञानाची लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत गरज आहे. महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग दर्शन प्रदर्शन आयोजणामुळे सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी घेण्याचा आत्मिक अनुभव सर्वांनी घ्यावा असे मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रुख्मिणी दीदींनी रिसोड ब्रह्माकुमारीज परिवाराकडून बारा ज्योतिर्लिंग दर्शन प्रदर्शनी उत्कष्ट आयोजन केल्याबद्दल विशेष कौतुक केले. ईश्वर सृष्टीवर अवतरीत होऊन आपले कार्य करित आहे त्या ईश्वराचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविण्याची संधी महाशिवरात्री निमित्त ब्रह्माकुमारीज परिवाराला प्राप्त झाली आहे.राजयोग समजून घेतल्यामुळे अनेक परिवाराच्या दैनंदिन जीवनात अमूलाग्र सकारात्मक बदल झाला आहे.प्रत्येक मनुष्याला आज एकाकी, दुःखी, निराश वाटत आहे. सर्व भौतिक सुख सुविधा असूनही मन अशांत आणि दुःखी आहे यांचे कारण मनुष्याला आपल्या स्वत्वाची, आत्मिक व अध्यात्मिक ज्ञानाची ओळख राहली नाही. ब्रह्माकुमारीज संस्था मनुष्याला त्यांच्या आत्मिक गुणांची ओळख करुन देऊन दैवी गुण धारण करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य निरंतर संपूर्ण विश्वात करित आहे. ब्रह्माकुमारीजकडून दिला जाणाऱ्या राजयोगाच्या ज्ञानामुळे मनातील अंधःकार दूर होतो. तरी राजयोग जाणून घेण्यासाठी सर्व रिसोड वासियांनी सात दिवसाचा निशुल्क असणारा कोर्स ब्रह्माकुमारीज सेंटरला येऊन करावा असे आवाहन रुख्मिनी दीदींनी केले.उदघाट्न समारंभाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी गीता दीदींनी केले तर प्रमुख अतिथी व मान्यवरांचे आभार ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी मानले.प्रसंगी ब्रह्माकुमारीज परिवारातील ज्ञानार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

122
9425 views