logo

चिखली मैना येथे संयुक्त विद्यमानाने शिवजयंती सोहळा पार पडला.

नागपूर ग्रामीण:
काटोल तालुक्यातील चिखली मैना येथे छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच व बळीराजा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती सोहळा पार पडला. याप्रसंगी चिखली मैना येथील सरपंच ,जेष्ठ नागरिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा वंदना दिली. बळीराजा ग्रुपच्या माध्यमातून सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट गावातील नागरिकांना ,बालमित्रांना, विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. शिवजयंती सोहळा पार पाडण्याकरिता ग्रामपंचायत मधील पदाधिकारी ,पोलीस पाटील, शिवभक्त मंडळी यांनी परिश्रम घेतले.

81
2801 views