जीवनकरिता सोशल फाउंडेशन काटोल येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
नागपूर ग्रामीण:
दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त जीवन करिता सोशल फाउंडेशन काटोल येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सहयोग बँकेचे व्यवस्थापक राजेशजी ताम्बुस्कर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. याप्रसंगी जीवन करिता सोशल फाउंडेशन चे डायरेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री योगेशजी चाफले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक काळात कोणत्याही व्यक्तीची गुलामगिरी केल्यापेक्षा एक अभ्यासू प्रामाणिक शिवरायांचा योद्धा व्हा आणि शिवरायांचे विचार आत्मसात करा असे विद्यार्थ्यांना संबोधित केले .तर एव्ही फाउंडेशनचे संचालक विकास सोमकुवर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भागवत अकॅडमीचे विद्यार्थी रितिक नासरे ,वैभव रेवतकर ,जयेश वांद्रे, प्रदीप महाजन, राजेश सोनबरसे, रुपेश केने, विशाल केने व जीवनकरिता सोशल फाउंडेशन चे पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होते.