logo

रविकिरण महाराज यांचा २६ मार्चला जळगाव (दादावाडी) येथे भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन

जळगाव । रामराज्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्री औदुंबरेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त खान्देशचे सुप्रसिद्ध कीर्तनकार रविकिरण महाराज (दोंडाईचाकर) यांचा भव्य कीर्तन सोहळा २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता दादावाडीतील जैन मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता महाआरती होणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामराज्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे पदाधिकारी व सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.

18
1485 views