logo

येत्या ५ दिवसांत तापमान ३६ अंशांपर्यंत जाणार

जळगाव सद्यःस्थितीला दुपारपर्यंत पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे आणि नंतर उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे वाऱ्यांमुळे तापमानातील फरक वाढतो आहे. २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान शहरातील तापमान हे ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शहरातील तापमानात चढ-उतार बघायला मिळत आहे. ही चढ-उतार २७ फेब्रुवारीपर्यंत होत राहणार आहे. या काळात किमान तापमान १४ ते १८ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.

12
1277 views