
लहुजी शक्ती सेना जिल्हा नागपूर आढावा बैठक संपन्न*
*लहुजी शक्ती सेना जिल्हा नागपूर आढावा बैठक संपन्न*
*येत्या १ मार्च 2025 रोजी होणाऱ्या पुणे येथे लहुजी शक्ती सेना आयोजित भव्य मातंग समाजाचे राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी लहुजी शक्ती सेना जिल्हा नागपूर व शहराची आढावा बैठक नागपूर येथील रवीभवन येथे घेण्यात आली.या आढावा बैठकीत नागपूर विभागातील ३ जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा बोलविण्यात आले होते आणि त्यांच्या जिल्ह्यातून अधिवेशनाकरिता होणाऱ्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला*
*बैठकीच्या अध्यक्षस्थानी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. गजाननजी बावणे साहेब हे होते*
*या बैठकीचे मार्गदर्शक लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव मा महेश जी खोडके साहेब*
*नागपूर जिल्हाध्यक्ष मा रवींद्रजी खडसे साहेब*
*विदर्भ उपाध्यक्ष सागर भाऊ जाधव*
*विदर्भ महिला आघाडीच्या प्रमुख मा भारतीताई कांबळे*
*नागपूर शहराध्यक्ष मा रमेश जी पाडन साहेब*
*वरील मान्यवर उपस्थित होते.*
*या बैठकीत होणाऱ्या भव्य महाअधिवेशना ची पूर्वतयारी, नियोजन, प्रचार व प्रसार व समाज बांधव व कार्यकर्ते यांना जाण्या येण्याची कशी व्यवस्था करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.*
*याप्रसंगी अधिवेशनाच्या पोस्टरचे जाहीर प्रकाशन सुद्धा करण्यात आले*
*त्याचप्रमाणे मीडिया नागपूर जिल्हाप्रमुख पदी म्हणून शुभम भोलारामजी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली*
*या बैठकीला नागपूर विभागातून ३ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते त्यामध्ये वर्धा जिल्हाध्यक्ष मा अमोल दादा खंदारे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष मा पायघन साहेब, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा राजूजी आमटे साहेब*
*तसेच या बैठकीला प्रामुख्याने युवा आघाडी नागपूर जिल्हाध्यक्ष भारत भाऊ शिंदे, विद्यार्थी आघाडी नागपूर जिल्हाध्यक्ष शुभम दादा हिवरारे, विदर्भ सरचिटणीस अंकुश जी बावणे, विदर्भ संघटक दयालजी बावणे, जिल्हा कोर कमिटीचे अध्यक्ष नितीनजी वाघमारे, वाडी शहराध्यक्ष कृष्णाजी खोडके, हिंगणा विधानसभेतून श्री अंबादास जी काळे, निवृत्ती जी वानखेडे, जिल्हा संघटक संजयजी डोंगरे, पारशिवनी तालुक्यातून संदेश जी खडसे, नागपूर शहर सचिव राजू जी साळवे, वर्धा जिल्हा सरचिटणीस गणेश जी मुंगले, काटोल शहराध्यक्ष अजय काळे, दक्षिण पश्चिम अध्यक्ष राजेश भाऊ बावणे, सामाजिक कार्यकर्ता श्री संजयजी ठोसर, शिवाभाऊ तायवडे, तसेच नागपूर शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते*
*बैठकीचे सूत्रसंचालन रामटेक विधानसभा प्रमुख मा. अंकुश बावणे साहेब यांनी केले.*