logo

छत्रपती शिवरायांचा इतिहास हा परिवर्तनाचा इतिहास आहे.* *डॉ.शिवानंद भानुसे यांचे प्रतिपादन*



*एकलारा* : छत्रपती शिवरायांच आयुष्य हा व्यक्ती ते विश्वासाठी एक दीपस्तंभ आहे. आरसा आहे. पारदर्शक असा वारसा आहे. त्यांनी विविध क्षेत्रात मनंदड निर्माण केले. छत्रपतींच्या इतिहास केवळ ढाल तलवारींचा नाही तर परिवर्तनाचा आहे. असे प्रतिपादन इतिहास संशोधक, शिवव्याख्याते डॉ.शिवानंद भानुसे यांनी एकलारा येथे केले. ते शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते.
डॉ.शिवानंद भानुसे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे व जिजाऊमाता यांची प्रेरणा होती. या दोघांनाही त्यांच्या वडिलांकडून ही प्रेरणा मिळाली होती. दोघांचेही घराण्यात दोन पिढ्यापासून त्या दिशेने वाटचाल सुरू होती. शिवरायांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मक्तेदारी व गुलामगिरी मोडून काढली. समता स्थापित केली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन जागतिक इतिहासातील पहिले एकमेव मानवतावादी योद्धा, शासक, प्रशासक, शिक्षणतज्ञ, मानसशास्त्रज्ञ भाषाशास्त्रज्ञ, उत्कृष्ट अभियंता होते. त्यामुळेच रयत त्यांना कुळवाडी भूषण, लोककल्याणकारी राजा मानत होती. त्यांचा आदर्श घेऊन आज आपण सर्वांनीच वाटचाल केली पाहिजे. असे डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अशोक श्रीराम अंभोरे हे होते. तर विचारपिठावर श्री बबनरावजी केंदळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी उपस्थिती खालील प्रमाणे होती.
श्री संजय अंभोरे, लक्ष्मण आंभोरे,विकास आंभोरे नागेश अंभोरे,प्रसाद आंभोरे,मधुकरराव आंभोरे ,वसंता आंभोरे ,शेष राव आंभोरे ,रामकृष्णा आंभोरे, सुधाकरराव आंभोरे,हर्षल आंभोरे ,बंडू आंभोरे, प्रकाश घेवंदे,प्रकाश आंभोरे, गजानन आंभोरे, रामदास आंभोरे ,मनोहर आंभोरे,विष्णू चेके,अशोक झगरे, छगन अंभोरे,राजू गवले,हरिभाऊ ठेंग,अरुण जोशी,रमेश जपे,शेख गुलाब,साहिल घेवंदे,संदीप घेवंदे,अजाबराव घेवंदे,राजू बोरकर,गोपाल खरात,विनोद आंभोरे,सुनील पानगोळे,सागर मोदी ,ज्ञानेश्वर मोदी,संजय पुरी,अनिल अंभोरे,प्रमोद अंभोरे,गणेश अंभोरे,अमोल झगरे,कुंदन महाळणकर,ज्ञानेश्वर आंभोरे,कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री सुधाकर अंभोरे यांनी केले.

2
1092 views