
गानविश्वात नवा तारा : श्रीकृष्ण मालंडकर.
फेब्रुवारी २०१६ मध्ये
श्री श्रीकृष्ण मालंडकर मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमधून सेवानिवृत्त झाले. त्यांना लहानपणापासूनच गाणी ऐकण्याची आवड होती. त्यामुळे ते कानसेन तयार झाले होते.त्यांनी गाणं शिकण्याचं ठरवलं तेव्हा हीच गोष्ट त्यांच्या चांगलीच पथ्यावर पडली.
त्यांनी या क्षेत्रातील ख्यातनाम गायक मिलिंद इंगळे यांच्याकडे गाण्याचं शिक्षण घेतलं. पण तीन महिन्यातच कोविड आला आणि तेही संपलं. तेथून प्रतिकूल परिस्थितीत हार न माता घरी रियाज सुरू केला आणि हळूहळू गाण्याची प्रगती होत गेली.
अनेक शोज मधून गाणं गाण्याचा त्यांना योग आला. कराओके क्लब मध्ये गाणे गाण्याला मर्यादा असतात. आणि शोजही खूप खर्चिक असतात अशा बिकट परिस्थितीवर मात करीत त्यांनी परिश्रमपूर्वक घरीच रेकॉर्डिंग स्टुडिओ तयार केला आणि आपले रेकॉर्डिंग आपणच तयार करावे, या कल्पनेतून घरी त्यांनी स्वतःचा स्टुडिओ तयारकेला. या घरातील स्टुडिओमध्ये त्यांनी आज पर्यंत पाचशे पेक्षा अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. यातील अनेक गाणी युट्युब वर अपलोड केली आहेत. त्याला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यांचे फाॅलोअर्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.सेवानिवृत्ती नंतर गाणं हीच आवड जोपासून त्याचं आता छंदात रुपांतर त्यांनी केल आहे. संगीत ही अतिशय उत्तम आरोग्य हितकारक उपचार पध्दत असून त्यांच्या निराकरण सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे ते नेहमी अभिमानाने आवर्जून सांगतात.
कालच्या श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्तच्या सोहळ्यात त्यांना भक्तिगीते गाण्याची संधी मिळाली, हे त्यांच ते भाग्यच समजतात. . मंदिरातही अनेक श्रोत्यांनी त्यांच्या गाण्याला दाद देत मनःपूर्वक स्तूती केली आहे.
अशा या गुणी श्रीकृष्ण मालंडकरांचा समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. साहेब आपणांस भविष्यातील उज्ज्वल यशस्वीतेसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!