नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी १९ फेब्रुवारी (नाशिक):- नाशिक मध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साठी नाशिक मध्ये अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करण्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले होते. त्याचबरोबर आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभर नाशिककर शिवरायांच्या चरणी लीन होत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक सायंकाळी निघाली होती. या मिरवणुकीमधे नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मिरवणुकीला महिलांनी तसेच लहान मुला मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये अनेक महिला आणि मुली भगवा पोशाख परिधान करून सहभागी झाल्या होत्या.
ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.