logo

रिसोड तालुक्यातील केशवनगर येथील साखर कारखाना परिसरात आग पण मोठा अनर्थ टाळला

रिसोड : रिसोड तालुक्यातील केशवनगर येथील साखर कारखाना परिसरात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली या आगीमध्ये साखर कारखाना परिसरातील काही झाडेझुडपे गवत जळून खाक झाले. या बाबाची सूचना रिसोड येथे नगरपरिषदच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. रिसोड नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी तातडीने अग्नीशमन दल विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने वाहनासह घटनास्थळ पाठवीले व सदर आग आटोक्यात आणली. यामुळे एक मोठा अनर्थ टळला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. कारण या परिसराला लागूनच शेतकऱ्यांच्या शेती असून या शेतीमध्ये गहू हरभऱ्याची पिके सुकलेल्या अवस्थेत आहे. ही जर आग पसरली असती तर कदाचित शेतकऱ्यांचे गहू हरभरा पिकाला नुकसान झाल्या असते. अशी चर्चाही परिसरात केली जात आहे.सदर आग आटोकात आणण्यासाठी रिसोड नगर परिषद चे अग्निशमन दल विभाग वाहनाचे कर्मचारी चालक अझरुद्दीन,संजू पवार यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यावेळी त्यांना माजी सरपंच गजानन बाजड,पोलिस पाटील सुभाष गायकवाड़, कोतवाल संजय दगडगाव यांनी अग्निशमन दल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले तसेच तलाठी बायस्कर,तलाठी उइके,मंडल अधिकारी लोखंडे, यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.

57
3447 views