logo

उद्याला सावनेर येथे शिव जयंतीचे जय शिवाजी सामाजिक संस्था,मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिग्रेडद्वारे आयोजन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी सामाजिक संस्था,मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त सहकार्याने चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ पासून शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मंडप उभारून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात चित्रकला स्पर्धा,भाषण स्पर्धा,प्रश्नमंजूषा,निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धा व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.उद्या १९ फेब्रुवारीला २०२५ ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर सावनेर शहरात जय शिवाजी सामाजिक संस्था,मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने दरवर्षी महोत्सव साजरा केला जातो. उद्याला पण दरवरषीप्रमाणे सकाळी ८ वाजता ढोल ताशांच्या गजरात शिवगर्जना,बाईक रॅली,शिवस्मारक माल्यार्पण सोहळा,जिजाऊ वंदना व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत समारंभ करण्यात येणार आहे.यानंतर लगेच शिवछत्रपती समाज भुषण पुरस्कार २०२५ बक्षीस वितरण व शिवभोजनाचे कार्यक्रमाचा समारोप आयोजीत केला आहे.
तरी सावनेर शहरातील शिवप्रेमींना शिव जन्मोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जय शिवाजी सामाजिक संस्था,मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिग्रेडद्वारे केले आहे.

1
359 views