logo

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज 🙏 दिग्दर्शक उतेकर यांचा छावा हा चित्रपट खरा इतिहास सांगणारा ठरत आहे.

सविस्तर बातमी,-
*" उत्तेकरांचा असली छावा आणि कोल्हेनी मतांसाठी केलेला नकली कावा "*

*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज* (स्वराज्याचं धाकलं मालक) यांच्या जीवनावर आधारीत हिंदी चित्रपट *छावा* शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण देशभर प्रदर्शित झाला.

लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,* विनीत कुमार कवी कलश, आशुतोष राणा हंबीरराव मोहिते आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत.

उत्कृष्ट दिग्दर्शन, सहज सुंदर अभिनय, खिळवून ठेवणारे युद्ध प्रसंग, बाणासारखे खोलवर रुतणारे संवाद आणि इतिहास जिवंत करणारं महाराजांच व्यक्तिमत्व यामुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरत आहे. सर्वच चित्रपटगृहात हाऊस फुल्लचे बोर्ड लागलेले दिसून येतं आहेत.

ज्यांनी अमोल कोल्हे यांची *स्वराज्य रक्षक संभाजी* ही मराठी मालिका पाहिली आहे आणि त्यात दाखविल्या प्रमाणे *छत्रपती संभाजी महाराजांचा* इतिहास मनात साठवला आहे अश्या लोकांचा चित्रपट पाहताना गोंधळ उडू शकतो..

त्यांनी हा चित्रपट पहायला जाताना खालील गोष्टींची खबरदारी घ्यावी :-

1) *स्वराज्य रक्षक संभाजी* मालिकेत अनाजी दत्तो (पंत) ही व्यक्तीरेखा अत्यंत पाताळयंत्री, कुटील आणि *छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध* कटकारस्थान करण्यात माहीर असणारी दाखवली गेली आहे. हे दाखवताना संभाजी महाराजांचे मुख्य शत्रू अनाजी पंत / ब्राम्हण होते असा आभास करून देण्यात आला आहे.

*छावा* चित्रपटात अनाजी दत्तो (पंत) हे महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्या बरोबरीने राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यासाठी *छत्रपती संभाजी महाराज* यांच्या विरोधात कट कारस्थान करतात असं दाखविले गेले आहे. सत्ता पदासाठी व मराठा साम्राज्याच्या गादीसाठी चालू असलेला अंतर्गत कलह त्यासाठी रचली गेलेली षडयंत्र यांची इत्यंभूत माहिती देत असतानाच स्वराज्याचे मुख्य शत्रू मुघलच होते हे मुख्यत्वे करून सांगण्यात आले आहे.

2) *स्वराज्य रक्षक संभाजी* मालिकेत *छत्रपती संभाजी महाराज* यांचे मेव्हणे गणोजी शिर्के यांच्या गद्दारी बाबत थोडक्यात सांगण्यात आले आहे.

*छावा* चित्रपटात *छत्रपती संभाजी महाराजांना* पकडून देण्याकामी फितुरी करणारे आणि महाराजांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या गणोजी शिर्केबद्दल सविस्तरपणे दाखवले गेले आहे.

3) *स्वराज्य रक्षक संभाजी* मालिकेचा बराचसा भाग ब्राम्हणांना वाईट दाखवण्यात आणि मुघलांची काळी बाजू झाकण्यात खर्ची घालण्यात आला आहे.

*छावा* चित्रपटात स्वराज्याचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे खरे शत्रू हे मुघलच होते हे उघडपणे दाखवण्यात आलेले आहे.

4) *स्वराज्य रक्षक संभाजी* मालिकेमध्ये *छत्रपती संभाजी महाराजांचा* मृत्यू कसा झाला हे दाखवण्याचे जाणूनबुजून टाळले आहे. चाळीस दिवस औरंगजेबाने महाराजांच्या शरीराची चाळण केली त्यांच्या देहाची विटंबना केली हे दाखवण्याऐवजी अचानक मालिका बंद करण्यात आली.

*छावा* चित्रपटांमध्ये औरंगजेबाने *छत्रपती संभाजी महाराजांची* कशी क्रूर पद्धतीने हत्या केली हे इतिहासात जसे नमूद आहे तसे दाखवले गेले आहे. मुघल क्रूर होते आणि त्यांचा मुख्य उद्देश साम्राज्य विस्तार आणि धर्मप्रसार हाच होता हे इथे अधोरेखित करण्यात आले आहे.

*निष्कर्ष :-*
अमोल कोल्हे यांनी *छत्रपती संभाजी महाराजांचा* इतिहास स्वतःला किंवा आपल्या मालकाला हवा तश्या पद्धतीने मांडला आहे.

एका समाजाला जाणूनबुजून खलनायक दाखवणे आणि दुसऱ्या समाजाचा क्रूर इतिहास दाखविण्याची वेळ आली असताना अचानकपणे मालिका बंद करणे यामागे त्यांचा कोणत्या समाजाचं लांगूलचालन करण्याचा हेतू होता हे विचारण्याची वेळ आली आहे.

क्षणिक सत्तापदासाठी आणि परकोटीच्या ब्राम्हण द्वेषापोटी इतिहास बदलायला निघालेल्या या आणि यांच्या सारख्या इतर प्रवृत्तीना वेळीच आळा घातला पाहीजे..
स्पष्ट विचार मत -
श्री. राजुशेठ पांचरास
वारतांकण -
काळुराम राजगुरू पुणे
9604525101

14
5607 views