logo

फलटण शहरामध्ये आठवडा भाजी विक्रीत्यांची व शेतकरी मुख्यधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली....

कोरोना काळामध्ये फलटण शहरातील आठवडा बाजार या जागे मध्ये बदल केला होता.परंतु परिस्थितीत बदल झाल्यानंतर आठवडा बाजार पुन्हा बदल केल्या नंतर.भाजी विक्रेते आणि शेतकरी यांना अशा काही जागा दिल्यागेल्यात त्यामध्ये धंदा तर सोडा पण भवानी सुद्धा होत नाही.असे भाजी विक्रेते यांनी सांगितलं.त्याच बरोबर ज्या दुकाना पुढे भाजी विक्रेते बसत आहेत.त्यांची आणि दुकानदार यांचा वाद होत असलेल्या निदर्शनास आल्यामुळे तसेच पार्किंगचा सुद्धा विषय समोर येत आहे.यामुळे भाजी विक्रेते व शेतकरी यांनी हा पवित्रा घेतला आहे.यामुळे १६ फेब्रुवारी रविवारी विक्रेते माळजाई मंदिर,तेलंग डॉक्टर,लॉ कॉलेज येथे विक्रेते विक्री करण्यास बसले होते.यावरून फलटण नगर परिषद येथील अधिकारी आणि विक्रेते यांचा मध्ये वाद विवाद सुरू जाहले याला थोड्या प्रमाणात छावणीचे स्वरूप आले होते.त्यानंतर तात्काळ मुख्याधिकारी यांनी भाजी विक्रेते तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटना व सर्व पक्ष्यांना बोलावून मीटिंग घेतली व गुरुवार पर्यंत अंतिम निर्णय देऊ असे सांगितले.आता संपूर्ण फलटण तालुक्याचे यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.


45
5935 views
  
1 shares