logo

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठी नाशिककरांची जय्यत तयारी

प्रतिनिधी १८ फेब्रुवारी (नाशिक):- १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवासाठी नाशिककर जय्यत तयारी करताना दिसत आहेत. नाशिक मध्ये अनेक ठिकाणी स्टेज उभा करण्याचे काम सुरू आहे. रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक सजावट करण्यात येत आहे. यामध्ये भगव्या रंगाची आकर्षक झालर, भगव्या रंगाचे झेंडे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या मधोमध दुभाजकावरील खांबांवर भगवे झेंडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी अवघा एकच दिवस बाकी असल्यामुळे जोरदार तयारी करताना नाशिककर दिसत आहेत. रात्री सुद्धा तयारी करताना नाशिककर दिसत आहेत. स्टेज उभा करण्याचे काम रात्री सुद्धा चालू आहे.

नाशिकमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अप्रतिम सजावट केल्यामुळे तसेच आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे नाशिकचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. अनेक ठिकाणी नाशिककरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. यामुळे नाशिक मध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

68
4557 views