logo

नाशिक रोड येथील कोर्टात जिल्हा अतिरिक्त प्रथम जिल्हा सत्र व दिवाणी न्यायवरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या शुभहस्ते संपन्न

नाशिक ए आय एम समाचार नासिक रोड येथे रविवारी 4.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत संदीपकुमार मोरे मिलिंद साठे मुंबई उच्च न्यायाचे तथा नाशिक पालकमंत्री सारंग कोतवाल नाशिक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी आणि नाशिक जिल्हा प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयंत दळवी अन्न औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य नरहरी झिरवाळ नाशिकचे कलेक्टर जलज शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री पोलीस अधीक्षक विक्रांत देशमाने विधी सचिव विलास गायकवाड यांच्या शुभहस्ते जिल्हा अतिरिक्त प्रथम सत्र न्यायालय जिल्हा दिवाणी न्याय वरिष्ठ स्तर या दोन्ही न्यायालयाचे उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते पार पाडला ह्या कोर्टाचे काम पूर्ण करण्यासाठी नाशिक रोड एडवोकेट बारचे अध्यक्ष सुदाम गायकवाड बारचे सदस्य व ज्येष्ठ वकील मंडळी यांनी सर्वतोपरी मेहनत घेऊन हे कार्य पूर्णत्वास नेले प्रथम प्रमुख अतिथी मान्यवरांचा स्वागत समारंभ स्वागत गीत म्हणून व फीत कापून तसेच दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले नंतर प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह शाल देऊन सत्कार केला यामध्ये बारचे सदस्य गायकर उमेश साठे दमयंती दोंदे महेश गायधनी सानप यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. यानंतर अजित दादा पवार यांनी उद्घाटन समारंभाच्या भाषणात सांगितले की मुंबईमध्ये बीकेसी सारख्या ठिकाणी नवीन उच्च न्यायालयाची भव्य अशी सुसज्ज इमारत उभी करण्याचा आमचा मानस राहणार आहे तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पात मी गरजू लोकांना भरपूर मदत कशी मिळेल याकडे माझे खास लक्ष राहणार आहे नाशिक रोड येथे प्रथम जिल्हा अतिरिक्त व सत्र व दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन माझ्या व उच्च न्यायाधीशांच्या हस्ते झाले याचा मला आनंद होत आहे कारण या न्यायालयात सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील लोकांचा प्रवास व वेळ वाचणार आहे कारण नाशिक रोड हे सर्व प्रवासांच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती ठिकाण मानले जाते त्यामुळे सिन्नर तालुक्यातून येणारे लोक नाशिककडे न जाता येथेच येऊन त्यांना योग्य तो न्याय मिळेल जर त्यांना अपील करायचे असेल तर डायरेक्ट हायकोर्टात जावे लागेल परंतु मागील काळात हे न्यायालय स्थापित नसताना सिन्नर इगतपुरी तालुक्यातील लोकांना नाशिकच्या कोर्टात यावे लागत होते व त्यामुळे प्रवास खर्च व वेळेचा अभाव जाणवत होता परंतु आता या न्यायालयामुळे त्यांचा मार्ग सोप्पा झाला व लवकरात लवकर त्यांना न्याय कसा मिळेल याकडे येथील वकील मंडळी व न्यायाधीशांनी विचार करावा म्हणजे त्यांचा न्यायालयावर विश्वास बसेल लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री यांची आढावा बैठक घेऊन तीन कायदे तयार केले त्यावर व त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावे महाराष्ट्र मध्ये गतिमान व प्रगतिशील कायदा व न्याय याची अंमलबजावणी करण्याचे काम सरकार करणार आहे नाशिक धार्मिक तसेच कृषी व्यापारी औद्योगिक क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते लोकांना वेळेवर न्याय कसा मिळेल यावर आमचा जास्तीत जास्त भर राहणार आहे भारतीय संविधानात लोकशाहीचे तत्वे सांगितल्याप्रमाणे आमचे सरकार त्याची तंतोतंत पालन करून ती लोकशाही जनमानसात निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि लोकांचा न्यायालयावर जास्त विश्वास दृढ बनेल याकडे आमचे लक्ष राहील आपल्या प्रमुख भाषणात उच्च न्यायालयाचे मकरंद कर्णिक यांनी सांगितले की मी तसा नाशिकचा भूमिपुत्र आहे माझे वकिलीचे शिक्षण नाशिक एन बी टी कॉलेजमध्ये झालेले आहे त्यामुळे नाशिक हे माझे माहेर म्हटले तरी चालेल नाशिकचे सर्व वकील माझे मित्र व बंधूच आहे मी त्यांना सांगतो की आम्ही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जरी असलो तरी घटनेच्या प्रमाणे न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आम्ही न्यायाधीश अधिकार म्हणून आहे परंतु खरे आम्ही लोकसेवक आहे त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल यावर काम आम्ही करतो वकिलांनी सुद्धा आपल्या न्यायालयीन कामकाजाच्या व्यतिरिक्त काही वेळ मनाचा ताण कमी करण्यासाठी स्पोर्ट सारखे ऍक्टिव्हिटी कराव्या जेणेकरून मनाचा ताण कमी होऊन आपले वकिलीचे काम करण्यास सुलभ व आम्हाला पण न्याय देण्यास चांगली मदत होईल यामुळे पक्षकारांचा वकिलावरील विश्वास व न्यायालयावरील विश्वास हा दृढ बनेल न्यायपालिकेने जस्टीस ॲक्ट दि डोअर स्टेप प्रमाणे काम केले पाहिजे कारण आम्ही लोकसेवक आहोत तसेच उपमुख्यमंत्री यांना विनंती करुन सांगतो की प्रत्येक न्यायालयात एसी बसविण्यात यावी कारण न्याय देण्यासाठी जर वकिलाचे व न्यायाधीशांचे डोके शांत असेल तरच सुलभित्या व चांगला न्याय देता येईल थंडवासाठी एसी सर्व न्यायालय कक्षात बसविण्यात यावी असे सांगितले उद्घाटन समारंभाचे स्वागतीय व अध्यक्षीय भाषण न्यायमूर्ती श्रीचंद जगमलानी यांनी केले तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत न्यायमूर्ती तथा पालकमंत्री सारंग कोतवाल मिलिंद साठे संदीपकुमार मोरे यांनी पण उद्घाटन पर भाषणे केली शेवटी उद्टघाटन समारंभाचे आभार जिल्हा प्रथम अतिरिक्त व सत्र न्यायाधीश जयंत दळवी यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला विलास गायकवाड आमदार सरोज अहिरे आमदार दिलीप काका बनकर आणि मोठ्या संख्येने वकील वर्ग कोर्टातील कर्मचारी अधिकारी वर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र उपस्थित होते.

11
3105 views