*!! संविधान गौरव समारंभ!!*
रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी लोणावळा येथे भारताचे संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हा लोणावळ्यातील सर्व जातीधर्माचे तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सर्वं लोक एकत्र येऊन एक विचाराने एक दिलाने भव्य संविधान मिरवणूक काढली गेली आणि त्याप्रसंगी जाहीर सभा होऊन संविधानाच्या ७५ प्रती लोणावळ्यातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या धर्म गुरुंना, समाजाला, सर्व पक्षांच्या प्रमुखांना, शाळा काॅलेज आणि शासकीय अधिकाऱ्यांना बौद्ध भिक्खूच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना अशी एकत्र सर्व धर्मीय मिरवणूक पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. त्याप्रसंगीची छायाचित्रे